रविवार, ६ मार्च, २०११

संस्काराची रुजवणी करणारी जिल्हा परिषद शाळा विजयनगर

जिल्हा परिषद शाळा विजयनगर हि शाळा धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात आहे. शाळेत एकूण पटसंख्या ८२ असून उपस्थिती १००% आहे.श्री दिलवरसिंग वसावे हे मुख्याध्यापक आहे.श्री संभाजी आहिरे ,श्रीमती तुळसा चौरे उपशिक्षक आहेत.शाळेत परीपाठाच्या वेळी मराठी,हिंदी,आणि इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हटली जाते.गणित अबॅकस प्रणाली विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जात आहे.संस्काराची रुजवणी करून विविध भाषेत पारंगत केले जात आहे.विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास रुजल्याने ते विविध उपक्रमात स्वंस्फूर्तीने सहभागी होत आहे. असे हि संस्कार घडविणारी शाळा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा